राहुलबाबत न्यायालयच अंतिम निर्णय घेईल: मा.गो. वैद्य

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना स्वत:ला निर्दोष सिद्ध करावे लागेल आणि या प्रकरणी अंतिम निर्णय न्यायालयच घेईल करेल, अशा प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना स्वत:ला निर्दोष सिद्ध करावे लागेल आणि या प्रकरणी अंतिम निर्णय न्यायालयच घेईल करेल, अशा प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भिवंडी न्यायालयाने आज (बुधवार) गांधी यांना जामीन मंजूर केला. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना वैद्य म्हणाले, 'जर न्यायालयाने गांधी यांना जामीन मंजूर केला असेल तर ही चांगली गोष्ट आहे. जामीन मिळणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. हे प्रकरण पुढे सुरूच राहणार आहे, त्यात नवीन काही नाही. जर राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारादरम्यान तशाप्रकारचे (वादग्रस्त) वक्तव्य करणे हे नवीन नाही. शेवटी अंतिम निर्णय न्यायालयाच घेईल.' तसेच 'जर ते (गांधी) माफी मागण्यास नकार देत असतील तर त्यांनी संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली आहे हे न्यायालयात सिद्ध करून दाखवावे', असेही वैद्य पुढे म्हणाले.

राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी झालेल्या एका निवडणूक प्रचार सभेत संघाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधी यांची हत्या संघाने केली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याबद्दल संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

Web Title: Court Will Take action against Rahul: Vaidya