गोहत्येवरून योगींचा यू-टर्न

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

लखनौ - गोहत्या आणि गायींच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्याचा निर्णय अंगलट येताच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आता माघार घेतली आहे. माध्यमे आणि बड्या अधिकाऱ्यांनी यावरून धारेवर धरताच राज्य सरकारने आपले हात वर करत हा चेंडू आता राज्याचे पोलिस महासंचालक सुलखानसिंह यांच्या कोर्टात टोलावला आहे. आज माध्यमांशी बोलताना पोलिस महासंचालकांनीही सरकारी पातळीवर असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. केवळ गोहत्येच्या गंभीर प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याचा आमचा विचार होता, असे सांगितले.

लखनौ - गोहत्या आणि गायींच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्याचा निर्णय अंगलट येताच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आता माघार घेतली आहे. माध्यमे आणि बड्या अधिकाऱ्यांनी यावरून धारेवर धरताच राज्य सरकारने आपले हात वर करत हा चेंडू आता राज्याचे पोलिस महासंचालक सुलखानसिंह यांच्या कोर्टात टोलावला आहे. आज माध्यमांशी बोलताना पोलिस महासंचालकांनीही सरकारी पातळीवर असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. केवळ गोहत्येच्या गंभीर प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याचा आमचा विचार होता, असे सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये पोलिस कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करू शकतात. अशा व्यक्तीस पोलिस बारा महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवू शकतात. या कायद्यान्वये दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष मंडळासमोर होते. याशिवाय गोहत्या करणाऱ्यांवर गॅंगस्टर कायद्यान्वये कारवाई करण्याचा सरकारचा विचार होता.