'सीपीएम'चा लोकशाहीवर विश्‍वास नाही : नक्वी

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

नवी दिल्ली - केरळमधील कोझीकोड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीएम) लोकशाहीवर विश्‍वास नसल्याची टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना नक्वी म्हणाले, "हे लोक ज्याप्रमाणे द्वेषाने वागत आहेत, त्यावरून त्यांचा लोकशाहीवर, भारतीय राज्यघटनेवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होत आहे. त्यांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे. त्यामुळेच त्यांना जगभर नाकारले जात आहे. त्यांनी आमच्या विचारसरणीविरुद्ध हिंसेने लढू नये', असा सल्लाही नक्वी यांनी यावेळी सीपीएमला दिला.

केरळमधील कोझीकोड येथे शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तीन स्वयंसेवकांवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीपीएमच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघ आणि सीपीएममध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यातूनच अनेकदा हिंसाही झाली आहे.