मोदी सरकार विश्वासघातकी - रणदीप सिंह सुरजेवाला

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

'फक्त प्रचारसभा व रॅली घेऊन आणि रेडीओवर मनमानी बात करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत', अशी टीका सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर केली.    

नवी दिल्ली : मोदी सरकारची 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, मोदी सरकार हे देश चालवण्यात अपयशी ठरले आहे, असे आज (ता. 26) काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेसने 'विश्वासघात - 4 साल, 40 सवाल' हे मोदींच्या अपयशावर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित केले. 'फक्त प्रचारसभा व रॅली घेऊन आणि रेडीओवर मनमानी बात करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत', अशी टीका सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर केली.    

 narendra modi

मोदी सरकार हे प्रपंच, प्रचार, प्रतिशोध व असत्य या चार गोष्टींच्या आधारावर उभे आहे. यामुळे हे सरकार 4 वर्ष केवळ देशवासियांचा विश्वासघात करत आले आहे, असे आरोप सुरजेवाला यांनी केला. 'झोलेभरकर झूठ और जुमलो से भरी लूट' अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

मोदींनी 4 वर्षात भरपूर पैसे खर्च करून जाहिराती बनवल्या, त्या चांगल्याही झाल्या, पण त्यामुळे हे सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले. चार वर्षात मोदींनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली, पण तितकी विकासकामे सरकार करू शकले नाही.    

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, दलित व अल्पसंख्यंकांवर अत्याचार, महिलांवरील बलात्काराचे वाढते प्रमाण, बेरोजगार तरूणांची वाढती संख्या, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, भ्रष्टाचार, वाढती महागाई, सीमेवरील व देशातील अशांतता हे सगळे घटक भाजप व मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. या चार वर्षात लोकांसमोरील प्रश्न सोडविण्यऐवजी अधिक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. अनेक मोठमोठी आश्वासने देऊन जनतेचा फक्त विश्वासघातच मोदी सरकार करत आले आहेत, असे मत सुरजेवाला यांनी मांडले. 

Web Title: criticized of narendra modis 4 years government by congress