पाकच्या गोळीबारामुळे बससेवा स्थगित, शाळा बंद

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

श्रीनगर : पूँच येथे सीमेपलीकडून रविवारी झालेला तोफांचा मारा आणि नंतरच्या गोळीबारामुळे प्रशासनाने ताबारेषेलगतची बस सेवा स्थगित केली आहे. जम्मू ते रावळकोट यादरम्यानची बससेवा एक आठवड्यासाठी थांबविण्यात आली आहे.

पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतीय लष्कराच्या पूँच जिल्ह्यातील चौक्यांना लक्ष्य केले. त्यामुळे पूँचमधील व्यापारी व सुविधा केंद्रांचेही नुकसान झाले असून, येथील व्यवसायाची मोठी हानी झाली आहे.  पूँच जिल्हा प्रशासनाने येथील शाळा बंद केल्या असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानकडून 24 तासांमध्ये तीनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारताकडून कोणतेही आव्हान दिलेले नसताना पाकिस्तानी सैन्याने सोमवारी सकाळी पावणेसात वाजता गोळीबार सुरू केला, असे लष्कराचे प्रवक्ते मनीष मेहता यांनी सांगितले. यामध्ये भारतीयांची जीवितहानी झाली नसून, भारतीय लष्कराने त्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले, असे त्यांनी सांगितले. 

कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला तोंड देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. सडेतोड उत्तर देण्यासाठी तुम्ही मोदी सरकारवर विश्वास ठेवायला हवा, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले.