सीआरपीएफची पहिली महिला तुकडी तैनात

पीटीआय
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

रांची - झारखंडमधील नक्षलविरोधी मोहिमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) आज पहिल्यांदाच महिलांची तुकडी तैनात करण्यात आली. २३२ बटालियन डेल्टा कंपनीच्या १३५ महिला जवान सध्या १३३ बटालियनकडून जबाबदारी समजून घेत आहेत. 

रांची - झारखंडमधील नक्षलविरोधी मोहिमेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून (सीआरपीएफ) आज पहिल्यांदाच महिलांची तुकडी तैनात करण्यात आली. २३२ बटालियन डेल्टा कंपनीच्या १३५ महिला जवान सध्या १३३ बटालियनकडून जबाबदारी समजून घेत आहेत. 

रांचीमधील खूंती भागात नक्षलग्रस्त जंगलात ही मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. सीआरपीएफचे पोलिस महासंचालक संजय ए. लाठकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्‍टोबरला या तुकडीचा सीआरपीएफमध्ये समावेश करण्यात आला. झारखंडमधील नक्षली घुसखोरी थांबविण्यासाठी ही तुकडी काम करणार असून त्यांनी मोहिमा राबविण्यास सुरवातही केली आहे. महिला बटालियन क्रमांक १३३ चे प्रमुख नीरज पांडे यांनी तर या महिला शूर असून त्यांना सध्या नक्षलविरोधी मोहिमांचा अनुभव दिला जात असल्याचे सांगितले. यासाठी त्यांना सीआरपीएफच्या अकादमीत 

नक्षल्यांविरुद्ध लढण्याचे प्रशिक्षणही दिले गेले आहे. महिला जवानांचा समावेश झाल्याने आमची नक्षलविरोधी भागात मोहिमा राबविण्याची ताकद दुपटीने वाढल्याचेही पांडे यांनी आवर्जून सांगितले. या १३५ महिलांच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या शक्ती तिरकेय यांनी आम्हाला देशासाठी काम करयाचे असून, त्यासाठीच आम्ही येथे आल्याचे म्हटले. नक्षल्यांमुळे लोकांना त्रास होत असून देशाची प्रगती ही खुंटत असल्याने यविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक गिरी प्रसाद यांनी महिला नक्षलींशी लढण्यासाठी अशा महिला तुकड्या आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून त्या चांगले काम करून दाखवतील असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच पुरुष व महिला जवानांत कोणताही फरक नसल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. या महिला तुकडीला आधुनिक शस्त्रे आणि त्यांचे आराखडे अमलात आणण्यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञानही पुरविण्यात आले आहे.

देश

समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक...

03.30 AM

सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत...

02.33 AM

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM