कच्च्या तेलाच्या दराने गाठला उच्चांक

वीज पुरवठ्यावरही परिणाम
ukraine russia war crude oil rate increased break record
ukraine russia war crude oil rate increased break record e sakal

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ल्याची घोषणा केल्यानंतर भारतातील शेअर बाजार जोरदार आपटला. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीचाही भडका उडाला. गुरुवारी ब्रेंट कच्च्या तेलाचा दर पहिल्यांदाच १०० डॉलर प्रतिपिंपावर पोहोचला. तब्बल सात वर्षांनंतर कच्च्या तेलाचे दराने उच्चांक गाठला आहे.

ukraine russia war crude oil rate increased break record
चीनच्या लढाऊ विमानांची पुन्हा घुसखोरी; तैवानच्या ADIZ मध्ये दाखल

रशियाच्या युद्धाच्या पवित्र्यामुळे ‘नाटो’मधील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र, असे अनेक विकसित आणि विकसनशील देश आहेत जे रशियातून होणाऱ्या तेल निर्यातीवर विसंबून आहेत. त्यांच्यावर या युद्धामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया हा जगातील तिसरा सर्वांत मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया मुख्यत: युरोपातील रिफायनरीला कच्चे तेल पाठवतो. युरोपीय देश जवळपास २० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल रशियातून मागवतात. याशिवाय जागतिक स्तरावरील एकूण तांबे आणि अॅल्युमिनियमच्या उत्पादनाचा दहा टक्के वाटा रशियाकडे आहे.

ukraine russia war crude oil rate increased break record
मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?

वीज पुरवठ्यावरही परिणाम

रशिया आणि युक्रेन युद्ध झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती १०० ते १२० डॉलर प्रति पिंपापर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अनेक देशांतील वीजपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रतिपिंपाहून अधिक होऊ शकतात.

इंधनाच्या भडका

रशिया नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार असून कच्च्या तेलाच्या उत्पादनातही रशियाचा मोठा वाटा आहे. युद्धामुळे सुरू झाल्याने कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार आहे. ज्यामुळे इंधनाच्या किमतीचा भडका उडू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com