काश्‍मीरमध्ये पुन्हा हिंसाचार; संचारबंदी लागू

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

श्रीनगर : आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात आज (मंगळवार) सकाळी बंदीपूर येथे झालेल्या चकमकीत एक जण ठार झाला. जुलैपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामध्ये बळी गेलेल्यांची संख्या आता 80 झाली आहे. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासनाने काश्‍मीरमधील सर्व दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी आंदोलकांनी निदर्शने सुरुच ठेवली आहेत.

संचारबंदीमुळे स्थानिक मशिदीमध्येच प्रार्थना करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हिंसक आंदोलनानंतर लागू झालेल्या संचारबंदीमुळे यंदा ईदच्या दिवशी श्रीनगरमधील बाजारपेठेतही शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. 

गेल्या काही दिवसांमधील आंदोलनांना पुन्हा लागलेले हिंसक वळण आणि फुटीरतावाद्यांनी ईदच्या दिवशी मोर्चा काढण्याची दिलेली धमकी यामुळे प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. 8 जुलै रोजी ‘हिज्बुल मुजाहिदीन‘चा दहशतवादी बुऱ्हाण वाणी याला सुरक्षा दलांनी ठार केल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू झाला आहे. आतापर्यंतच्या हिंसक आंदोलनात एकूण 80 ठार, तर दहा हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.

प्रशासनाने लष्करासही सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंसाचाराची पार्श्‍वभूमी असलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. 

Web Title: Curfew imposed in Kashmir valley on Eid