हिज्बुलचा म्होरक्‍या ठार झाल्याने काश्मीरमध्ये बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जुलै 2016

श्रीनगर - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान मुझफ्फर वाणी (वय 22) हा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्याने आज (शनिवार) काश्मीर खोऱ्यात फुटीरतावादी नेत्यांकडून बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात क़डक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाणी मारला जाणे हे लष्कराचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

काश्‍मिरी युवकांना आपल्या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांना दहशतवादाच्या मार्गाला लावण्यासाठी वाणी प्रसिद्ध होता. त्याचे अनेक व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर फिरत असतात. गुप्तहेरांकडून त्याच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांबरोबर संयुक्त शोधमोहीम सुरू केली. या वेळी झालेल्या कारवाईत वाणीसह इतर दोन दहशतवादी मारले गेले. वाणीने आजपर्यंत एकही गोळी कधी मारली नसली तरी तो जम्मू-काश्‍मीरमधील "मोस्ट वॉंटेड‘ दहशतवादी होता. त्याच्यावर दहा लाखांचे इनामही जाहीर झाले होते. 

वाणी हा काश्‍मीरच्या दक्षिण भागात असलेल्या त्राल गावातील एका श्रीमंत कुटुंबातील होता. त्याचे वडील येथील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. तरुण, शिकलेल्या स्थानिक मुलांना तो दहशतवादी होण्याचे आवाहन करत असे. मोठ्या भावाला काही जवानांनी मारहाण केल्याचे त्याला समजल्यावर चिडून जाऊन 2010 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने हिज्बुल मुजाहिदीनमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील त्याच्या प्रक्षोभक व्हिडिओज्‌मुळे तो कट्टरतावादी काश्‍मिरी नागरिकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. वाणीच्या कारवायांमुळेच काश्‍मीर खोऱ्यामध्ये परकीय दहशतवाद्यांपेक्षा स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे.

टॅग्स