नोटाबंदीवरील याचिकांची उद्या सुनावणी

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - अधिक मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अनेक आव्हान याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या सर्व उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वर्ग करून बुधवारी (ता.23) सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली.

ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याविषयीची माहिती न्यायालयात दिली व यावर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानंतर सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने त्यास होकार दर्शविला. रोहतगी म्हणाले की, नोटाबंदीवरील गेल्या वेळच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार केंद्राने याचिका वर्ग करण्यासाठी विनंती केली आहे. केंद्राच्या या बंदीमुळे बॅंका व टपाल विभागांपुढे रांगा लागल्या आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 18 नोव्हेंबरच्या सुनावणीत म्हटले होते. नोटाबंदीविरोधात देशातील कनिष्ठ व उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या केंद्राच्या याचिकेस न्यायालयाने विरोध केला होता.

देश

नवी दिल्ली - "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाची सत्ता हाती येईपर्यंत कधीच...

02.00 PM

मुंबई : मला मुलाला जन्म घालण्याची कोणतीही हौस नाही. पण, आता मुलीला जन्म देताना भीती वाटते, अशी खळबळजनक याचना टीव्ही अभिनेत्री...

01.30 PM

पलक्कड : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते...

12.09 PM