तिरुपती देवस्थानवर "सायबर हल्ला'

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

ज्या संगणकांच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. ही संपूर्ण व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी देवस्थान समिती "टीसीएस' या कंपनीच्या माध्यमातून संरक्षणविषयक उपाययोजनांची आखणी करत असते

तिरुपती - तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच्या तीन डझनांपेक्षाही अधिक संगणकांवर "वॉन्नक्राय' रॅन्समवेअर या व्हायरसने हल्ला केल्याने संपूर्ण ऑनलाइन यंत्रणाच कोलमडून पडली आहे. देवस्थान समितीच्या मुख्यालयामध्ये अडीच हजार संगणक असून, स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे तीन डझन संगणक बसविण्यात आले आहेत त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे देवस्थान समितीचे जनसंपर्क अधिकारी टी. रवी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

ज्या संगणकांवर हा हल्ला करण्यात आला ती जुन्या धाटणीची असून नंतर ती अपडेट करण्यात आली. सध्या तरी व्हायरसचा सामना करण्यात आम्हाला यश आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, ज्या संगणकांच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. ही संपूर्ण व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी देवस्थान समिती "टीसीएस' या कंपनीच्या माध्यमातून संरक्षणविषयक उपाययोजनांची आखणी करत असते.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM