भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेश अग्रवाल यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

अग्रवाल यांच्या निधनानंतर भाजप, काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

अहमदाबाद - दैनिक भास्कर समुहाचे अध्यक्ष रमेश अग्रवाल (वय 73) यांचे आज (बुधवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्रवाल यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

आज सकाळी अकरा वाजता दिल्लीहून अहमदाबादला पोहचल्यानंतर त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला. त्यांना अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली. मोदींनी अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहत म्हटले आहे, की रमेश अग्रवाल यांच्या निधानाने दुःख झाले. माध्यम क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय काम कायम लक्षात राहील. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

अग्रवाल यांच्या निधनानंतर भाजप, काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.