चीनकडे दुर्लक्ष करत दलाई लामा तवांगमध्ये

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

इटानगर: अरुणाचल प्रदेशच्या नऊ दिवसांच्या दौऱ्यावर असलेले तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आज तवांगला पोचले. चीनच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत तवांगभेटीवर आलेल्या दलाई लामा यांच्या आगमनाने स्थानिक नागरिकांत मोठा उत्साह पाहावयास मिळाला. नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय हजारोच्या संख्येने नागरिक त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर आले होते.

दलाई लामा 10 एप्रिलपर्यंत तवांगला थांबणार आहेत. यादरम्यान ते अनेक व्याख्याने देणार असून लोकांशीही भेटणार आहेत. यापूर्वी दलाई लामा 2009 मध्ये तवांगला आले होते. आठ वर्षांच्या कालखंडानंतर आलेल्या लामांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावरून चीन संतापलेला आहे. लामा यांचा दौरा सुरू होताच चीनकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. चीनला उत्तर देताना भारताने म्हटले, की आध्यामिक गुरूच्या दौऱ्यावरून कोणत्याही प्रकारचा कृत्रिम वाद करण्याची गरज नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून, चीनने भारतातील अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करण्याची गरज नाही.

चीनच्या संतापात भर
तिबेट धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावरून संतापलेल्या चीनने आज भारताला गर्भित इशारा दिला आहे. "ग्लोबल टाइम्स'च्या प्रकाशित एका लेखात भारत हा आर्थिक, लष्करी आणि राजकीय पातळीवर मजबूत असलेल्या चीनचा विरोध सहन करेल का, असा सवाल केला आहे. चीनचा जीडीपी भारतापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हिंदी महासागरापर्यंत पोचण्याची चीनची क्षमता आहे. आमचे संबंध भारताच्या शेजारील राष्ट्राशी चांगले आहेत. अशा स्थितीत चीन भारताबरोबर जमिनीवरील राजकारणात उतरला, तर चीन भारताकडून पराभूत होईल काय, असा प्रश्‍न विचारला आहे. अरुणाचल प्रदेशचा बहुतांशी भाग हा तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा ग्लोबल टाइम्सच्या लेखात केला आहे.

Web Title: Dalai Lama in Tawang