गोरखालॅंडसाठीचे आंदोलन सुरूच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

दार्जिलिंग: वेगळ्या गोरखालॅंडसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) सुरू केलेले दार्जिलिंग बंद आंदोलन 12 दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे गुरुवारी (ता. 31) जाहीर केले असले, तरीही आज "बंद' पाळल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले.

"जीजेएम'चे नेते बिमल तमंग यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली. मात्र काल रात्री या संघटनेचे प्रमुख बिमल गुरुंग व रोशन गिरी यांनी सध्याचे बंद आंदोलन स्थगित करण्याची शक्‍यता फेटाळून लावली. ""हे आंदोलन राज्याच्या भल्यासाठी असल्याने ते पुढे सुरूच राहणार आहे,'' असे त्यांनी सांगितले.

गोरखालॅंडच्या समर्थकांनी आज दार्जिलिंगमध्ये फेरी काढून तमंग व त्यांचे सहकारी पश्‍चिम बंगालचे एजंट असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान यापूर्वी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या रोमाला राय (वय 48) या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा "जेजीएम'ने केला. पोलिसांनी तो फेटाळला आहे. दार्जिलिंग बंद आंदोलन 8 जूनपासून सुरू झाले. यातील मृतांची संख्या दहा झाली आहे. आंदोलनाचा आज 81 वा दिवस होता.

देश

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

10.24 AM

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या...

09.12 AM

नवी दिल्ली : मागणीअभावी अर्थव्यवस्थेतील मंदी आणि त्यामुळे विकासदरावर होणारा परिणाम याची चिंता सरकारला भेडसावते आहे. त्यामुळे यावर...

07.09 AM