दार्जिलिंग 'बंद'मुळे प्राण्यांची उपासमार

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

पद्मजा नायडू उद्यानातील खाद्यपुरवठा घटला

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल): वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीवरून दार्जिलिंगमध्ये काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी "बंद' पुकारण्यात आला आहे. येथील अस्थिर परिस्थितीचा फटका नागरिकांना तर बसतच आहे; पण उद्यानातील प्राणीही त्यातून सुटलेले नाहीत. दार्जिलिंगमधील "पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क' (पीएनएचझेडपी) या प्राणीसंग्रहालयात अतिदुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन केले जाते; मात्र "दार्जिलिंग बंद'मुळे या खाद्यपुरवठा थांबला असल्याने या प्राण्यांची अन्नावाचून उपासमार होऊ लागली आहे.

पद्मजा नायडू हे विशेष उद्यान देशातील सर्वाधिक उंचीवरील उद्यान असून तेथे लाल पांडा, हिमबिबट्या, तिबेटी लांडगा व पूर्व हिमालयातील नष्ट होण्याच्या मार्गावरील प्राण्यांचे संवर्धन व प्रजनन केले जाते. उद्यानात एकूण 49 दुर्मिळ जातींचे 350 प्राणी आहेत; मात्र "बंद'मुळे अन्नाचा पुरवठा कमी झाल्याने व अजून काही दिवस संप सुरू राहिला तर प्राण्यांना खाद्य कसे पुरवायचे, अशी चिंता प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. संचालक पिअरचंद म्हणाले, ""येथे रोज प्राण्यांसाठी 100 किलो मांस, 80 किलो चारा, 50 ते 60 किलो फळे व 50 किलो गहू व पीठ यांची आवश्‍यकता असते. आमच्याकडे सध्या अन्नाचा साठा आहे. तसेच जंगल जवळ असल्याने चारा मिळविणे शक्‍य आहे. तरी संप अजून काही दिवस सुरू राहिला, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मांस व फळे रोज उपलब्ध करणे अशक्‍य होणार आहे.''
अन्नपुरवठ्यासाठी पर्यायी मार्गांबाबत बोलताना ते म्हणाले, की जर संप सुरूच राहिला तर ताज्या अन्नाच्या पुरवठ्यासाठी आम्ही येथील प्रशासन व राजकीय पक्षांची मदत घेणार आहोत. आम्ही प्राण्यांना उपाशी ठेवू शकत नाही. "बंद'मुळे प्राणीसंग्रहालयाच्या उत्पन्नातही घट झाली आहे.

उद्यानात विविध प्रकारच्या प्राणी
दार्लिजिंगमधील पद्मजा नायडू हे प्राणीसंग्रहालय हे "झुलॉजिकल इन्फर्मेशन मॅनेजमेंट सिस्टिम' (झेडआयएमएस) या संस्थेचे सदस्य आहे. आशियाई भागातील प्राण्यांचे संवर्धन करणारी ता विश्‍वस्त संस्था आहे. प्राणीसंग्रहालयात सस्तन, उभयचर, सरपटणारे प्राणी व विविध पक्ष्यांचा समावेश आहे.