गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यालयावर छापा; हत्यारे जप्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे दार्जिलिंग 'बंद' आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. आज पोलिसांनी गुरुंग यांच्या कार्यालयावर छापा टाकत हत्यारे जप्त केली आहे.

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) अध्यक्ष विमल गुरुंग यांच्या कार्यालयावर आज (गुरुवार) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 

वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे दार्जिलिंग 'बंद' आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. आज पोलिसांनी गुरुंग यांच्या कार्यालयावर छापा टाकत हत्यारे जप्त केली आहे. यामध्ये कुऱ्हाड, कोयते, कुकरी यासारख्या हत्यारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. 

दार्जिलिंगमधील प्रसिद्ध चौक बझार व मॉल रस्त्यावरील बहुतेक दुकाने बंद आहेत. शहरातील अनेक भागांत पोलिस गस्त घालत असून अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. सरकारी व "गोरखालॅंड टेरिस्टोरिअल ऍडमिनिस्ट्रेशन'ची (जीटीए) कार्यालये सोमवारपासून (ता.12) सुरू झाली आहेत. कर्मचाऱ्यांनी काम करू यासाठी "जीजेएम'ने चौक बझारमधील सरकारी कार्यालयावर मंगळवारी (ता.13) मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना थांबविल्यावर संतप्त आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. गोरखालँडची लढाई आणखी तीव्र करण्यात येणार असून, यामुळे पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागेल, असे गुरुंग यांनी म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार: मुख्यमंत्री फडणवीस
रामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
कर्जमाफीचे श्रेय नक्की कोणाचे?​
नक्षत्रांचं देणं... ​
युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान​
जनलोकपाल व "लोकायुक्त'साठी पुन्हा जंतरमंतर गाठणार - अण्णा हजारे​