Threat : दाऊद गँगचा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना फोन; म्हणाले, तुझा खून होणार

या घटनेनंतर भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात ठाकूर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
pragya-singh
pragya-singhSakal

भोपाळ : भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Sadhvi Pragya Thakur) यांना दाऊद गँगकडून (Dawood Gang) जीवेमारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली असून, धमकी देणाऱ्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. 'मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत तुझा खून (Murder) होणार आहे, अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरून देण्यात आली आहे. (Life Threaten To Sadhvi Pragya Thakur)

pragya-singh
वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा बेपत्ता? मुंबई पोलिसांकडून दिल्लीत शोध सुरू

दरम्यान, या घटनेनंतर भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात ठाकूर यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच फोन करणार्‍याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेवेळी साध्वी यांच्यासोबत उभ्या असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला असून, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रज्ञा ठाकूर यांना आलेल्या धमकीचा फोन नेमका कुठून आला याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसून, तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

pragya-singh
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांना पाठिंबा; म्हणाल्या, तर मी पण...

साध्वींकडून नुपूर शर्मांचे समर्थन

काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर देशासह परदेशातून या विधानाचा विरोध करण्यात आला. दरम्यान, शर्मा यांच्या या विधानाचे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समर्थन करत भारत हिंदुंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे विधान प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com