दाऊदने त्याच्या भाच्याच्या लग्नाला स्काईपवरून उपस्थिती लावली होती

"मोस्ट वॉन्टेड" असलेला डॉन दाऊद आपला भाचा अलीशाहाच्या लग्नाला स्काईपवरून उपस्थित होता.
Dawood Ibrahim
Dawood IbrahimSakal

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं आज त्याचा भाचा अलीशाह पारकर याने सांगितलं. दाऊद सणासुदीला आपल्या घरच्यांशी संपर्क करतो असंही त्याच्या भाच्याने सांगितलं. अलीशाहची सध्या ईडीकडून चौकशी चालू आहे. विषय तसा मोठा आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात कोठडीत आहेत. मलिकांवर दाऊद इब्राहिम यांची बहिण हसीना पारकर हीच्यासोबत संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे हसीना पारकर हीचा मुलगा अलीशाहा याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने दाऊद पाकिस्तानात असल्याचा खुलासा केला होता. पण "मोस्ट वॉन्टेड" असलेला डॉन दाऊद आपला भाचा अलीशाहाच्या लग्नाला स्काईप कॉलवरून उपस्थित होता.

अली शाहा पारकर
अली शाहा पारकरSakal

अलीशाहा पारकर हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा. हसीना पारकर ही दाऊदची बहीण. तीचा अलीशाहा पारकर या आपल्या लहान मुलाच्या लग्नाच्या आधीच 2014 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तीचा मोठा मुलगा दानिश हा 2006 मध्ये अपघातात मृत्यू पावला. राहिला तो एकुलता एक लहान मुलगा. अलीशाहा पारकर. कुख्यात डॉनचा भाचा म्हणून त्याचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडणार होता. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या या लग्नसोहळ्यावर आख्या मुंबईचं लक्ष होतं. आपल्या एकुलत्या एक आई नसलेल्या भाच्याच्या लग्नाला दाऊद हजेरी लावेल असं सर्वांना वाटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सगळीकडे फिल्डिंग लावून ठेवली होती.

Dawood Ibrahim
Dawood IbrahimSakal

17 ऑगस्ट 2016. मुंबईतील जुहू परिसरातील एका पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये त्याच्या विवाहाचे रिसेप्शन होणार होते. देशातील सर्व सुरक्षा व्यवस्था याकडे लक्ष ठेऊन होत्या. दाऊद कोणत्याही परिस्थितीत सापडला तर त्याला पकडण्याचा डाव आखण्यात आला होता. हा एका गुंडाच्या भाच्याचा विवाह सोहळा असल्याने पोलिसांनी रिसेप्शनला जाणाऱ्या पाहुण्यांना आतमध्ये फोन नेण्यास बंदी घातली होती. त्यामुळे एकाही पाहुण्यास आतमध्ये फोन घेऊन जाता आलं नाही. ठरल्याप्रमाणे त्याचं लग्न दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील रसूल मशिदीत पार पडलं. आणि संध्याकाळी जुहूच्या ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये भव्य रिसेप्शन पार पडणार होतं. पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या रिसेप्शनला जवळपास ७०० लोकं हजर होते. या सर्वांकडे पोलिसांच लक्ष होतं.

स्थानिक उद्योगपतीची मुलगी आयेशा नगाणी हिच्यासोबत अलीशाहाचं रिसेप्शन पार पडलं पण त्या कार्यक्रमात दाऊद प्रत्यक्षरित्या हजर राहिला नव्हता. कारण तो स्काईप वरून लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित होता. त्यामुळे सर्वांनाच हुलकावणी देऊन तो लग्नाला हजर राहिला होता. त्याच भाच्याने आता त्याचा मामा आणि कुख्यात डॉन पाकिस्तानातील कराची येथे असल्याची कबुली दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com