दयाशंकरच्या जीभेवर 50 लाखांचे बक्षीस

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

लखनौ - बहुजन समजा पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या दयाशंकर सिंह यांची जीभ कापून आणणाऱ्याला बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

लखनौ - बहुजन समजा पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या दयाशंकर सिंह यांची जीभ कापून आणणाऱ्याला बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आज (गुरुवार) बसपचे उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते लखनौमध्ये एकत्र आले आणि त्यांनी दयाशंकर यांच्या अटकेची मागणी केली. दयाशंकर यांच्याविरूद्ध हजरतगंज येथील बसपचे कार्यकर्ते मेवालाल गौतम यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर दयाशंकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात ज्यावेळी पोलिस दयाशंकर यांच्या केसरबाग येथील निवासस्थानी पोचले त्यावेळी ते घरी नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा अन्य ठिकाणीही शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. दरम्यान बसपच्या चंदिगढ विभागाच्या प्रमुख जन्नत जहा यांनी दयाशंकरच्या जीभेसाठी 50 लाखाचे बक्षीस ठेवले आहे.

उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या तिकिट वाटपाबाबत भाष्य करताना दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना वारांगनेशी केली. त्यावरून त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. तसेच पक्षश्रेष्ठींनीही त्यांना तंबी दिली. त्यांनतर त्यांनी माफीनामा सादर केला. हा विषय संसदेतही गाजला. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सिंह यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगत मायावती यांची माफी मागितली. मात्र भाजप नेतृत्त्वाने दयाशंकर यांच्या वक्‍त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.