दयानिधी, कलानिधी मारन न्यायालयात अनुपस्थित

पीटीआय
सोमवार, 22 मे 2017

चेन्नई : बेकायदा दूरध्वनी कनेक्‍शन्स प्रकरणातील मुख्य आरोपी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी मारन आज केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. या प्रकरणी आता 6 जून रोजी सुनावणी होईल.

या प्रकरणातील अन्य चार आरोपी मात्र न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना आरोपपत्रांच्या प्रती जारी करण्यात आल्या. सीबीआयने 9 डिसेंबर 2016 रोजी दयानिधी आणि कलानिधी या मारन बंधूंसह अन्य आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

या सर्वांनी त्यांच्या निवासस्थानी 764 हायस्पीड डाटा लाइन्स वापरल्या होत्या आणि त्याचा वापर चेन्नईतील सन टीव्हीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सरकारचे 1.78 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आरोपपत्रात म्हटले होते. उच्च दूरसंचार सुविधा सेवा वर्गांतर्गत अवैधरीत्या वापरली आणि 2004-07 या काळात त्याची बिलेही भरली नाहीत.