'भाजप'वाल्यांनो घाबरू नका- राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक तक्रार दाखल केल्यानंतर प्रिय 'भाजप'वाल्यांनो घाबरू नका, असे ट्विट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केले आहे.

आपल्याला प्रत्येक धर्मात काँग्रेसचे हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह दिसते, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राहुल यांचे हे विधान आदर्श आचारसंहितेचे उघड उघड उल्लंघन असून, त्याबद्दल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी जोरदार मागणी सत्तारूढ पक्षाने केली आहे.

भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर गांधी यांनी ट्विटरवरून 'डिअर भाजप, डरो मत' असे ट्विट केले आहे. गांधी यांनी ट्विट केल्यानंतर अनेकांनी ते रिट्विट केले असून, लाइकही केले आहे.

दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 17) निवडणूक आयोगाची भेट घेऊन काँग्रेस व राहुल गांधी यांच्याविरुद्धची सात पानी तक्रार त्यांच्या हाती सोपविली. शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत. धर्माच्या आधारावर मते मागणे अयोग्य असल्याच्या ताज्या न्यायालयीन निकालाचा संदर्भही नक्वी यांनी दिला.

Web Title: Dear BJP, don't be afraid,' Rahul Gandhi