‘केंद्राच्या निर्णयाने देशात आर्थिक अराजकता येईल’

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

लखनौ - केंद्र सरकारच्या ५०० व एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने टीका केली आहे. केंद्राने देशात आर्थिक अराजकता निर्माण केली आहे, अशी टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे. 

देशातील मूळ मुद्यांवरून नागरिकांचे लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. गरीब आपल्या नित्याच्या गरजा भागविण्यासाठी धडपडत असताना त्यांचे जगणेही त्रासदायक केले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबत संसदेत मुद्दा उपस्थित केला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डाव्या पक्षांच्या एकीचे दर्शन घडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी येचुरी बोलत होते.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

10.33 PM

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

09.21 PM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

05.00 PM