मल्ल्यांविरुद्ध आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाची कारवाई

नवी दिल्ली: धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल खटल्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध न्यायालयाने आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाची कारवाई

नवी दिल्ली: धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल खटल्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध न्यायालयाने आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

न्यायदंडाधिकारी सुमीत आनंद यांनी हे वॉरंट बजावले आहे. लंडनमध्ये असलेल्या मल्ल्या यांना परराष्ट्र मंत्रालयामार्फत हे वॉरंट बजावण्यात येईल. धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्याच्या सुनावणीला मल्ल्या उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला किंगफिशर एअरलाइन्सने दिलेला एक कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी हा खटला दाखल आहे. विमानतळाने मल्ल्या यांच्याविरुद्ध एकूण 7.5 कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याप्रकरणी जून 2012 मध्ये चार खटले दाखल केले आहेत.

दरम्यान, 6 ऑगस्ट रोजी मल्ल्या यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. न्यायालयाने अनेकदा आदेश देऊनही मल्ल्या न्यायालयात हजर राहिले नव्हते. सरकारने यामध्ये लक्ष घालून मल्ल्या यांना हजर करावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती. मल्ल्या यांच्यावर 17 बॅंकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज बुडविल्याप्रकरणीही कारवाई सुरू आहे.

देश

मुझफ्फरनगरजवळ १४ डबे रुळावरून खाली मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ (जि. मुझफ्फरनगर) शनिवारी (ता. १९) पुरी-हरिद्वार...

09.00 AM

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017