Delhi Violence : गोळीबार करणारी व्यक्ती अल्पवयीन, कुटुंबीयांचा दावा

Delhi Hanuman Jayanti Violence
Delhi Hanuman Jayanti Violencee sakal

नवी दिल्ली : दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत हिंसाचार (Delhi Hanuman Jayanti Violence) झाला. यावेळी एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. पोलिसांनी आरोपीला आज सकाळी अटक केली आहे. पण, हा गोळीबार करणारी ही व्यक्ती अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Delhi Hanuman Jayanti Violence
दिल्लीतील हनुमान जयंती मिरवणूकीदरम्यानच्या हिंसाचारप्रकरणी नऊ जणांना अटक

आरोपीचा जन्माचा दाखला दाखवत कुटुंबीयांनी दावा केला की, ''त्याचा जन्म २००५ मध्ये झाला होता. त्यामुळे आता तो फक्त १७ वर्षांचा आहे. तो अल्पवयीन आहे.'' पण, तो २२ वर्षांचा असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या एका प्रकरणात या आरोपीचा हात होता, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तसेच त्याच्याकडून पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे. या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय? -

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात शनिवारी सायंकाळी हनुमान जयंती मिरवणुकीत दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यानंतर हिंसाचार उसळला. यावेळी दगडफेक करण्यात आली आणि काही वाहने देखील जाळण्यात आले. यावेळी एका व्यक्तीने गोळीबार देखील करण्यात आला. या हिंसाचारामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या हिंसाचारात सहावेळा गोळीबार झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हे दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com