दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख नायब राज्यपालच

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - नायब राज्यपाल (एलजी) हे देशाच्या राजधानीतील प्रशासकीय प्रमुख आहेत, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाने नायब राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. 

दिल्ली सरकार आणि दिल्लीतील नायब राज्यपाल यांच्यातील वादासंदर्भातील नऊ याचिका एकत्र करत दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने या प्रकरणांची सुनावणी केली. दरम्यान दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने दिल्ली केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याची माहिती केंद्र सरकारने न्यायालयात दिली होती. ‘दिल्लीतील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार दिल्लीच्या नायब राज्यपालांनी कोणत्याही हरकतीशिवाय काम करावे ही आम आदमी पक्षाची मागणी स्विकारण्यात येत नाही‘, असा निर्णय न्यायालयाने दिला. तसेच नायब राज्यपाल हे दिल्लीतील प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हणत न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत.

टॅग्स