सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करण्यास विरोध करणाऱ्याची हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 28 मे 2017

सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करण्यास विरोध करणाऱ्या एका ई रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करण्यास विरोध करणाऱ्या एका ई रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शनिवारी संध्याकाळी जीटीबी नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ दोन मुले मद्यप्राशन केलेल्या अवस्तेत मूत्रविसर्जन करत होते. मात्र या प्रकारास एका ई रिक्षा चालकाने विरोध केला. मात्र संतप्त झालेल्या मुलांनी रात्री त्यांच्या 14-15 मित्रंना सोबत आणले आणि रिक्षचालकाला मारहाण केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 14-15 माणसांनी टॉवेलमध्ये दगड बांधून रिक्षाचालकाला जबर मारहाण केली. एका प्रत्यक्षदर्शी ई रिक्षाचालकालाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो पळून गेल्याने बचावला.

प्रमोद या प्रत्यक्षदर्शी ई रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी हा दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. प्रत्यक्षदर्शीनेच त्या विद्यार्थीला शनिवारी संध्याकाळी महाविद्यालयाजवळ सोडले होते. "त्याच विद्यार्थ्याने हे कृत्य केले आहे. त्यानंतर तो किरोरी माल महाविद्यालयात गेला. आम्ही त्याला ओळखले आहे. आम्ही पोलिसांना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले आहे. मात्र पोलिसांना त्यास नकार दिला', असेही प्रमोदने सांगितले.