इंधनाचा टॅंकर उलटल्याने दिल्लीत वाहतूक कोंडी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

टॅंकर उलटून चार ते पाच हजार लिटर हवाई इंधन वाया गेले असावे, असा अंदाज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या अपघातामुळे दोन तास रस्ता वाहतुकीसाठी दोन तास बंद होता

नवी दिल्ली - हवाई इंधनाचा टॅंकर मूलचंद अंतर्वळण मार्गावर उलटल्याने मंगळवारी रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. टॅंकर उलटल्याने चार ते पाच हजार लिटर हवाई इंधन वाया गेले.

या अपघातात टॅंकरचा चालक आणि मदतनीस जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा हा टॅंकर 20 हजार लिटर हवाई इंधन घेऊन जात होता. टॅंकर उलटून चार ते पाच हजार लिटर हवाई इंधन वाया गेले असावे, असा अंदाज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या अपघातामुळे दोन तास रस्ता वाहतुकीसाठी दोन तास बंद होता. त्यामुळे रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.