"पक्षांतर्गत बाबींमध्ये मोदींचा हस्तक्षेप नाही'

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

अण्णा द्रमुकमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांचे नेते मोदी यांची वारंवार भेट घेत आहेत. त्यामुळे अण्णा द्रुमकच्या अंतर्गत प्रश्नांत मोदी हे हस्तक्षेप करत आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता

नवी दिल्ली - अण्णा द्रमुकमधील पक्षांतर्गत वादावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हस्तक्षेप करत आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मत ओ. पनीरसेल्वम गटाकडून आज मांडण्यात आले.

अण्णा द्रमुकच्या ओ. पनीरसेल्वम गटाचे नेते आणि पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही. मैत्रेयन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दुसऱ्या राजकीय पक्षातील अंतर्गत वादामध्ये मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत, असे म्हणाणे चुकीचे ठरेल.

अण्णा द्रमुकमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांचे नेते मोदी यांची वारंवार भेट घेत आहेत. त्यामुळे अण्णा द्रुमकच्या अंतर्गत प्रश्नांत मोदी हे हस्तक्षेप करत आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी आज पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील सद्यःस्थितीची माहिती आम्ही पंतप्रधानांना दिली, असे पनीरसेल्वम यांनी या वेळी स्पष्ट केले.