पंतप्रधानांच्या लहरीवर लोकशाही चालत नाही - मुलायमसिंह यादव

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

दररोज वृत्तपत्रात सीमेवरील घटनांची माहिती आपल्याला कळते. आपले बहादूर जवान हुतात्मा होत आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या पाठिशी संपूर्ण देश असताना पाकिस्तानची हिंमत कशी काय होते. सीमेवर सातत्याने हल्ले होत असताना पाकिस्तानविरुद्धच्या रणनीतीची माहिती अन्य पक्षांना का दिली जात नाही.
- मुलायमसिंह यादव, नेते, सपा

गाझीपूर - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीवरून तीव्र शब्दांत टीका केली. नरेंद्र मोदी मनमानीप्रमाणे कारभार करत असून, पंतप्रधानांच्या लहरीवर लोकशाही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.

येथील आरटीआय मैदानावर आयोजित सभेत यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले की, सध्या देशाची स्थिती आव्हानात्मक आहे. नोटाबंदीसंदर्भात भाजपने चुकीचे पाऊल उचलले आहे. शेतकरी आणि जवानांबरोबरच व्यापाऱ्यांनाही उद्‌ध्वस्त करण्याचे एकप्रकारचे कारस्थान आहे. शेतकरी आणि व्यापारी हे आपले सख्खे भाऊ असल्याचे अनेकदा सांगितले. शेतकरी शेती करतो आणि व्यापारी धान्याची विक्री करतो. परंतु कळत नाही की, पंतप्रधान काय विचार करत आहेत. ते धमकी देतात आणि म्हणतात की, प्रामाणिक लोक सुखाची झोप घेत आहेत. मग विरोध करणारे काय प्रामाणिक नाहीत काय, असा प्रश्‍नही मुलायमसिंह यांनी केला. मोदी हे गर्विष्ट झाल्याचा आरोप करत मुलायमसिंह म्हणाले की, पंतप्रधानांना गर्व झाला आहे; परंतु येथे मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या धोरणात संशोधन करावे. लोकशाहीत मनमानी चालत नाही. पंतप्रधान मनमानी करत आहेत. हे चालणार नाही. भारतातील नागरिक अडाणी, अशिक्षित आणि गरीब असले तरी जगातील सर्वांत समजदार आहेत.

देश

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017