सायकलवरून घेऊन जावा लागला भाचीचा मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

मलाकसद्दी गावात राहत असलेल्या अनंत कुमार यांच्या सहा महिन्यांच्या मुलीला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी अनंत कुमार हे पैसे आणण्यासाठी अलाहाबादला गेले असताना या मुलीचा मामा ब्रिजमोहन हा तिच्याजवळ होता. पण, उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

कौशांबी - सरकारी रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने मामाला आपल्या सहा महिन्यांच्या भाचीचा मृतदेह चक्क सायकलवरून घरी घेऊन जावा लागल्याची घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे घडली आहे.

ओडिशामध्ये आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या दाना मांझी यांच्या प्रकरणानंतर आता रुग्णवाहिका नाकारल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कौशांबी जिल्ह्यातील मलाकसद्दी गावात ही घटना घडली आहे. रुग्णालयाकडे विनंती करूनही त्यांनी भाचीचा मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका न दिल्याने सायकलवरून मला तिचा मृतदेह घरी न्यावा लागल्याचे मामाने सांगितले. या प्रकरणी आत्पकालीन सेवेवर हजर असणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलाकसद्दी गावात राहत असलेल्या अनंत कुमार यांच्या सहा महिन्यांच्या मुलीला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी अनंत कुमार हे पैसे आणण्यासाठी अलाहाबादला गेले असताना या मुलीचा मामा ब्रिजमोहन हा तिच्याजवळ होता. पण, उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. या मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी ब्रिजमोहन यांनी रुग्णालयाकडे मागणी केली. पण, ती नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाला विनंती केली. पण, त्यानेही 800 रुपये मागितल्याने त्यांना भाचीचा मृतदेह सायकलवरून 10 किमी अंतरावर घेऊन जावा लागाला. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक
बारामतीत पावसाच्या जोरदार सरी
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​