भारतात सर्वाधिक नैराश्यग्रस्त लोक; डोक्‍यावर वाढता ताण

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

विशेषत: तरुणाई नैराश्‍याच्या आजाराला बळी पडत असल्याचे दिसून आले.

धकाधकीची जीवनशैली आणि दैनंदिन जीवनातील असुरक्षिततेमुळे प्रत्येकाच्या डोक्‍यावरील ताणतणाव वाढत चालला आहे. नैराश्यग्रस्त लोकांची संख्या भारतात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. भारताप्रमाणेच जगभर ही समस्या दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हा धोका मान्य केलेला दिसतो.

2005 ते 2015 हा दहा वर्षांचा कालखंड लक्षात घेतला तर नैराश्‍यग्रस्त लोकांच्या संख्येत अठरा टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे दिसून येते. भविष्यामध्ये हे संकट अधिकच बिकट होणार असून, विकसनशील देशांमध्ये ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

नैराश्‍यामुळे वाढत जाणारे आत्महत्यांचे प्रमाण हे सर्वाधिक चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाई नैराश्‍याच्या आजाराला बळी पडत असल्याचे दिसून आले.

वाढते नैराश्‍य
7,88,000 लोकांनी 2015 मध्ये आत्महत्या करून जीवन संपविले

322 : जगभरातील नैराश्‍याने ग्रासलेले लोक

18.4 टक्के : नैराश्‍यग्रस्त लोकांच्या संख्येत 2005 ते 2015 मधील वाढ

नैराश्‍याचा आजार झालेल्यांची संख्या
देश -     नैराश्‍य - उद्विग्नता

भुतान : 30947 -   27304
श्रीलंका : 802321 -  669259
उत्तर कोरिया : 874632 - 886706
नेपाळ : 890361 -   999454
म्यानमार : 1917983 -   1727123
थायलंड : 2885221 -   2275400
बांगलादेश : 6391760 -  6900212
इंडोनेशिया : 9162886 -  8114774
भारत : 5,66,75969 -  38425093
चीन : 54815739 -  40954022

(स्रोत : जागतिक आरोग्य संघटना)

फोटो गॅलरी