राम मंदिराशिवाय विकासाला काय अर्थ! - विनय कटियार

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अयोध्येत राम मंदिर उभारण्याशिवाय विकास, शिक्षण आणि नोकरी याबाबत बोलण्यात काही अर्थच नाही. लवकरच आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारु.

अयोध्या - विकास आणि नोकऱ्या उपलब्ध करणे हे अयोध्येत राम मंदिर उभारण्यापुढे निरर्थक असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशात आज (सोमवार) पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत अयोध्येत राम मंदिर उभारण्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. आता कटियार यांनी राम मंदिरापुढे सर्वकाही निरर्थक असल्याचे म्हटले आहे. कटियार यांनी नुकतेच प्रियांका गांधी-वद्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

कटियार म्हणाले, की अयोध्येत राम मंदिर उभारण्याशिवाय विकास, शिक्षण आणि नोकरी याबाबत बोलण्यात काही अर्थच नाही. लवकरच आम्ही अयोध्येत राम मंदिर उभारु. देशाच्या एकात्मता आणि एकाग्रतेसाठी राम मंदिर उभारले जाणे खूप गरजेचे आहे. उत्तर प्रदेशात आम्हालाच बहुमत मिळेल.