'यूपी'चा विकास फक्त जाहिरातींमध्येच : गडकरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

सोनियांना मुलाची चिंता
मोदी एका गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. त्यामुळे ते बेधडकपणे काम करीत आहेत. खरी चिंता आहे, ती सोनिया गांधींना. राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य काय, या प्रश्नाने त्यांना पछाडले असल्याची टीका गडकरी यांनी बोलताना केली.

सुलतानपूर- उत्तर प्रदेशमधील विकास हा फक्त वृत्तपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्येच दिसतो, असा चिमटा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य करताना काढला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित भाजपच्या परिवर्तन रॅलीप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील रस्त्यांची अवस्था कशी आहे हे सर्वश्रुत आहे. येथे काम करणारे सरकार सत्तेत हवे, अशी सर्वांची इच्छा असून बसप, सपाने इतक्‍या वर्षांच्या सत्तेत काय केले, हे येथील जनतेने पाहिले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधक संसदेत एकत्र येऊन मोदी सरकारला लक्ष्य करीत आहेत आणि इथे ते एकमेकांशी भांडत आहेत. असे गडकरींनी निदर्शनास आणून दिले. गरिबांना नोटाबंदीची तमा नाही; कारण हा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे. मात्र, बहुतांशी राजकीय नेते यामुळे धास्तावले आहेत. नव्याने छापलेल्या 16 लाख कोटी नोटांच्या बदल्यात मात्र सहा लाख कोटी रुपये बॅंकांकडे परत आले असून, उर्वरित 10 लाख कोटी अशा नेत्यांकडे पडून आहेत आणि 31 डिसेंबरनंतर त्याला कवडीची किंमत राहणार नाही, असेही गडकरी यांनी सांगितले.