माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या निर्यातीत भारत आघाडीवर

पीटीआय
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली: भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या(आयसीटी) निर्यातीत आघाडी घेतली असून नवसंशोधनाच्या पातळीवरदेखील भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. यंदा जागतिक नवसंशोधन निर्देशांकात(जीआयआय) भारताला 60 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

नवी दिल्ली: भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या(आयसीटी) निर्यातीत आघाडी घेतली असून नवसंशोधनाच्या पातळीवरदेखील भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. यंदा जागतिक नवसंशोधन निर्देशांकात(जीआयआय) भारताला 60 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

जागतिक बौद्धिक संपदा संस्था(डब्लूआयपीओ), कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि INSEAD यांनी एकत्रितपणे जगभरातील 130 देशांच्या नवसंशोधन कामगिरीवरुन हा निर्देशांक तयार केला आहे. भारताचा शेजारी देश चीनला 22 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. मात्र, मध्य आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताने आघाडी घेतल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या निर्देशांकात स्वित्झर्लंड आघाडीवर असून नवी उत्पादने आणि सेवा सादरीकरणात स्वीडन, नेदरलँड्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांचे वर्चस्व कायम आहे.

नवसंशोधन क्षेत्रात भारताची कामगिरी सुधारण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आदेशावरुन विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. भारताचे इनोव्हेटिव देश म्हणून परीक्षण, इनोवेशन इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीकडे होती. त्यानंतर, नवसंधोधन क्षेत्रात भारताने सातत्याने सुधारणा केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भारताने माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवांच्या निर्यातीबाबत आघाडी घेतलीच परंतु विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधरांची संख्या(10), ई-पार्टिसिपेशन(27), जागतिक संशोधन आणि विकास कंपन्या(14), सरकारी ऑनलाईन सेवा(33), पायाभूत सुविधा(32), सर्जनशील वस्तूंची निर्यात(18), नॉलेज इम्पॅक्ट(30) आणि बौद्धिक मालमत्ता देयके(29) या निकषांवर सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे.

मात्र, राजकीय स्थैर्य आणि सुरक्षितता(106), व्यवसायासाठी अनुकूल वातावरण(121), शिक्षण(114), माध्यमिक स्तरावर विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर(104), माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा वापर(109), व्यवसाय स्थापनेसाठी पोषक वातावरण(114) आणि सोयीस्कर करप्रणालीबाबत(118) भारत पिछाडीवर गेला आहे.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण