धोनीनं झिवासोबत केलं 'असं' सेलिब्रेशन

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

धोनीने विजयानंतर काही वेळच सहकाऱ्यांसोबत कर्णधाराप्रमाणे सेलिब्रेशन करून मग नंतरचा सर्व वेळ हा आपली मुलगी झिवा व पत्नी साक्षी यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यात वेळ घालवला.

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सिझनमध्ये अंतिम फेरी ही चेन्नई सुपरकिंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये काल (ता. 27) रंगली. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये हा अंतिम रणसंग्राम पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून मात केली. चेन्नईला आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. हैदराबादने दिलेलं 179 धावांचं आव्हान चेन्नईनं अगदी सहजपणे पूर्ण केलं.

शेन वॉटसनची शतकी खेळी व अंबाती रायडूचा विजयी फटकार यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं व चेन्नईने एकच जल्लोष केला. पण या सगळ्यात उठून दिसला तो, मुलगी झिवाबरोबर सेलिब्रेशन करण्यात व्यस्त असलेला कॅप्टन कूल धोनी.  

धोनीने विजयानंतर काही वेळच सहकाऱ्यांसोबत कर्णधाराप्रमाणे सेलिब्रेशन करून मग नंतरचा सर्व वेळ हा आपली मुलगी झिवा व पत्नी साक्षी यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यात वेळ घालवला. दोन वर्षानंतरच्या कमबॅकनंतर धोनीचा चेहऱ्यावर विजयाची छटा स्पष्ट दिसत होती. पण नेहमीप्रमाणे विजयानंतर धोनीने झिवासोबत सोलिब्रेशन केले. मैदानाच्या लॉनवर झिवासोबत खेळणारा धोनी माध्यमांनी कैद केला. यानंतर धोनीने पत्नी साक्षी, मुलगी झिवा व आयपीएलची विजेती ट्रॉफी असा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला व यात झिवाने केलेली मागणी पूर्ण केल्याचा उल्लेख केला आहे.

पहिल्यापासून फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईच्या संघाने आपला दबदबा कायम राखला. विजेतेपद पटाकावल्यानंतर चेन्नईचा संघ चेन्नईला जाईल व चेन्नईत आपल्या समर्थकांसोबत हा विजय साजरा करणार असल्याचे धोनीने सांगितले.

Web Title: dhoni celebrates victory with daughter ziva and wife sakshi