दोन विमाने वेगाने समोरासमोर येतात तेव्हा...!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- दोन विमाने धावपट्टीवरून वेगाने समोरासमोर आली.. आणि विमानतळावरील लोकांच्या भुवया उंचावल्या, धडधड वाढली. आपल्या डोळ्यांदेखत दोन विमानांचा भीषण अपघात होणार असे वाटत असतानाच एक विमान उड्डाण घेतले.. आणि मोठी दुर्घटना टळली. दिल्ली विमानतळावर आज (मंगळवार) सकाळी हा प्रकार घडला. 

गोव्यातील विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान खाली घसरल्यानंतर काही वेळातच दिल्लीत हा प्रकार घडला. 
इंडिगो एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर टॅक्सीमार्गाकडे धावत होते तेव्हाच स्पाइसजेटचे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. दोन्ही प्रवासी जेट विमाने अगदी समोरासमोर आली. 
लँडिंगनंतर इंडिगो विमानासाठी वापरण्यात येणारी धावपट्टी स्पाइसजेटच्या उड्डाणासाठीही वापरण्यात आली. दोन्ही विमानांमध्ये पुरेसे अंतर होते, मात्र हवाई वाहतुकीच्या नियमांच्या ते विरोधात असून, त्यानुसार हे अंतर खूप कमी होते.  

या प्रकारांमुळे थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळ होतो, त्यामुळे अशा प्रकरणांची चौकशी केली जाते. नागरी विमान वाहतूक संचलनालय (DGCA) याप्रकरणी हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागाचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.