'यूपी दिवस' साजरा करण्याचा निर्णय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

युनायटेड प्रॉव्हिन्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे नामकरण 24 जानेवारी 1950 मध्ये "उत्तर प्रदेश' असे करण्यात आले.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये यंदा 24 जानेवारी रोजी "यूपी दिवस' साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. 

'युनायटेड प्रॉव्हिन्स' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या राज्याचे नामकरण 24 जानेवारी 1950 मध्ये "उत्तर प्रदेश' असे करण्यात आले. "या राज्याची व देशाची ओळख त्याच्या निर्मितीपासूनच आहे, असा विश्‍वास भाजप व योगी सरकारला असल्याने 24 जानेवारी हा "यूपी दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले.

या दिवशी राज्यातील सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.