'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहुर्तावर गाढव चढले बोहल्यावर!

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

बंगळूर- जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंगळवारी (ता. 14) दोन गाढवे बोहल्यावर चढले. नागरिकांनी दोन गाढवांचा विवाह मोठ्या उत्साहात लावून दिल्याची घटना घडली.

कन्नड चळवळी पक्षाचे व माजी आमदार वेताळ नागराज यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला होता. वधू गाढव म्हणून केम्पी व वर गाढव म्हणून केम्पा यांना सजवून कुबॉन पार्क येथे मंगळवारी सायंकाळी आणण्यात आले होते. दोन्ही गाढवांचे पाय एकमेकांना लावण्यात आले. विवाहानंतर त्यांना चुंबन घेण्यास भाग पाडले.

विवाहानिमित्त जमलेल्या नागरिकांनी हातातील गुलाबाचे फुल देऊन गाढवांना शुभेच्छा दिल्या. या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title: Donkeys get married on Valentine's day