काश्‍मीर मुद्याचे राजकारण करू नका - भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांशी सुरु असलेल्या मुद्याचे राजकारण करू नये आणि या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देऊ नये असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसला दिला आहे. 

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांशी सुरु असलेल्या मुद्याचे राजकारण करू नये आणि या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देऊ नये असा स्पष्ट इशारा भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसला दिला आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले, ‘आमच्या सरकारला काश्‍मीरचा मुद्दा हा वारश्‍याने मिळाला आहे आणि आमचे सरकार सरकार शांतता राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ज्याप्रकारे काश्‍मीरमधील तरुणांची दिशाभूल केली जात आहे. कॉंग्रेस गेल्या 68 वर्षांपासून या मुद्याचे राजकारण करत आहे. मी गुलाम नबी आझादांसह कॉंग्रेसला विनंती करतो की त्यांना काश्‍मीरच्या मुद्यावरून राजकारण करू नये‘ तसेच ‘काश्‍मीरमधील संघर्ष हा फुटीरतावाद्यांसोबतचा संघर्ष असून त्याला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देऊ नये. हा संघर्ष हिंदू-मुस्लिमांमधील असल्याबाबत गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो‘, असेही शर्मा पुढे म्हणाले. 

काश्‍मीरमधील वर्तमान स्थितीला सत्ताधारी पीडीपी-भाजप सरकारची युती कारणीभूत असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी केली होती.

टॅग्स