अमिताभजी तुम्ही गाढवांच्या जाहिराती करू नका : अखिलेश

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

रायबरेली: अमिताभजी तुम्ही गाढवांच्या जाहिराती करणे बंद करा, अशी कळकळीची विनंती समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज (सोमवार) केली.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतेच गोवा पर्यटनासाठी एक नवी जाहिरात केली आहे. यामध्ये कच्छच्या रणातील दुर्मिळ अशा गाढव या प्राण्याला दाखविण्यात आले असून, ते पाहण्यासाठी तुम्ही गुजरातला अवश्‍य भेट द्या, असे आवाहन अमिताभजींनी केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याच्या तोंडावर प्रचार जोरात सुरू असून, अखिलेश यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या वेळी त्यांनी गुजरात सरकारच्या जाहीरातींवरही तोंडसुख घेतले व अमिताभ बच्चन यांना अशा जाहिराती न करण्याची विनंतीही केली.