धमक्‍यांना घाबरत नाही, चर्चेस तयार: नायडू

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या विषयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी तहकूब होत आहे. शुक्रवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष यांनीही आपण या विषयावर बोललो, तर भूकंप होईल, असे प्रतिपादन केले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज (शनिवार) नोटाबंदीच्या निर्णयावर सरकार चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सांगितले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना नायडू म्हणाले, "आम्हाला धमक्‍या देऊ नका. आम्ही घाबरत नाही. आम्ही सविस्तर चर्चेस तयार आहोत. मात्र तुम्ही चर्चा सोडून मध्येच निघून जाऊ नये. अशा धमक्‍यांनी कोणालाही काही होणार नाही. तुम्ही काय करता ते आम्ही पाहू. तुम्ही तुमच्या पक्षाला पुनरुज्जीवित करू शकत नाही. लोकांकडे न जाता किंवा लोकप्रतिनिधींना सभागृहात ऐकून न घेता तुम्ही पळून जात आहात. तुम्ही दोन्ही बाजूने बोलत आहात. त्यामुळेच मी म्हणत आहे की तोंडी धमक्‍या देऊन संसदेचा आणि लोकशाहीचा अवमान करत आहोत.' असा आरोपही नायडू यांनी यावेळी केला.

"सरकार चर्चेपासून दूर पळत आहे. मला संसदेत बोलण्याची परवानगी दिली. तर भूकंप होईल. मी तेथे सर्व काही सांगेन', अशी टीका राहुल यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती.