'सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको'

file photo
file photo

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होत असून, सर्जिकल स्ट्राईकचा मतांसाठी वापर नको, असे हुतात्मा जवान हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेश निवडणूकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावरून मते मागण्याची शक्यता आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्याचा मतांसाठी वापर नको, असे हेमराजसिंह यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.

जानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानी दशतवाद्यांनी शिरच्छेद केला होता. हेमराजसिंह यांची आई म्हणाली, 'हेमराजसिंह यांचा शिरच्छेद केल्याचा सरकारने सर्जिकल स्ट्राईककरून सूड उगवला आहे. परंतु, खरंच हा सूड आहे का. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आहेत का? सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती पाकिस्तानी मारले गेले किंवा आपले मारले गेले याचे पुरावे आहेत का? याचे राजकारण करायला नको.'

हेमराजसिंह हुतात्मा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना विविध आश्वासने दिली होती. परंतु, ती आश्वासने अद्याप पुर्ण केली नाही. विधानसभा निवडणूकीत जवानांच्या नावावर मते मागू नयेत, असा दावा कुटुंबियांनी केला आहे.

'सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण व्हायला नको किंवा याचा मतांसाठी वापर व्हायला नको,' असे बबलू या जवानाच्या कुटुंबाने म्हटले आहे. बबलू हे जुलै 2016 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये हुतात्मा झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com