इसिस समर्थनार्थ घोषणा दिल्याने विमानाचे लँडिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जुलै 2016

मुंबई - दुबईहून कोचीकडे जात असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातील एका प्रवाशाने इस्लामिक स्टेट (इसिस) समर्थनार्थ घोषणा दिल्याने विमानाचे मुंबई विमानतळावर ईमरजन्सी लँडिंग करण्यात आले.

सुरक्षा रक्षकांनी घोषणा देणाऱ्या या व्यक्तीला अटक केली आहे. विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. विमानाचे ईमरजन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांनी खाली उतरविण्यात आले. घोषणा देणारा कोणत्या देशाचा नागरिक आहे, हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

आज (गुरुवार) पहाटे दुबईहून या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाण घेताच या व्यक्तीने इसिस समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे विमानाचा मार्ग बदलून विमान मुंबईत उतरविण्यात आले.