लखनौ मेट्रोला पहिल्याच दिवशी ब्रेक

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते लखनौ मेट्रोचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले होते, की नियोजित कार्यक्रमानुसार मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे.

लखनौ - मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या लखनौ मेट्रोला आज (बुधवार) पहिल्याच दिवशी ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. दुर्गापुरी ते मवईया स्थानकादरम्यान मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांना इमरजन्सी दरवाजातून बाहेर पडावे लागले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते लखनौ मेट्रोचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले होते, की नियोजित कार्यक्रमानुसार मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मेट्रोतून प्रवास करताना नागरिकांना वाट पाहावी लागणार नाही. बुधवारपासून मेट्रो सुरु होईल.

आज सकाळी सुरु झालेली मेट्रोला तांत्रिक कारणामुळे ब्रेक लागला. दुर्गापुरी ते मवईया स्थानकादरम्यान मध्येच मेट्रो बंद पडली. सुमारे 20 मिनिटे प्रवासी मेट्रोमध्ये अडकून पडले होते. अखेर मेट्रो प्रशासनाने घटनास्थळी जात प्रवाशांना इमरजन्सी दरवाजातून बाहेर काढले. 

Web Title: due to technical fault first day lucknow metro get stuck