नोटा बदलून देणाऱ्या उद्योगपती लोढांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणारे कोलकतामधील उद्योगपती पारसमल लोढा यांना आज (गुरुवार) मुंबई विमानतळावरून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना आज दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तमिळनाडूमधील खाण व्यावसायिक शेखर रेड्डी आणि दिल्लीतील वकील रोहित टंडन यांना 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याचा आरोप पारसमल लोढा यांच्यावर होता. आज सकाळी मुंबईहून मलेशियाला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ईडीने लोढासाठी लूकआऊट नोटीस बजावली होती. लोढांना आज न्यायालयात हजर करून चौकशी करण्यात येणार आहे.

लोढा यांनी 25 कोटी रुपये बदलून देण्याइतक्या नव्या नोटा कुठून आल्या, याचाही चौकशी करण्यात येणार आहे. टंडन यांच्या लॉ फर्ममध्ये 13.48 कोटी रुपयांची संपत्ती सापडली होती. तर, रेड्डी यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात 90 कोटी व 100 किलो सोने जप्त करण्यात आले होते.