मल्ल्याचे 100 कोटींचे फार्महाउस ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

बंगल्याची नोंदणीकृत किंमत 25 कोटी असली, तरी बाजारभावानुसार ती 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यात तरणतलावासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी त्याच्याभोवती फास आवळण्याची सुरवात ईडीने केली आहे

मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्याचे अलिबागजवळील मांडवा येथील फार्म हाउस सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी ताब्यात घेतले.

17 एकरांवरील या फार्म हाउसची किंमत 100 कोटी रुपये आहे. या वर्षाच्या सुरवातीलाच ईडीने मल्ल्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांवर टाच आणण्यास सुरवात केली. त्याचाच एक भाग म्हणून मांडवा परिसरातील फार्महाउस ताब्यात घेतले आहे. येथील बंगल्याची नोंदणीकृत किंमत 25 कोटी असली, तरी बाजारभावानुसार ती 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यात तरणतलावासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेसाठी त्याच्याभोवती फास आवळण्याची सुरवात ईडीने केली आहे.

आयडीबीआय बॅंकेचे 900 कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडी मल्ल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्‍यता आहे.