लालुप्रसादांच्या कन्येच्या मालमत्तांवरही छापे

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

हे छापे आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणासंदर्भात होते. लालु यांच्या मालमत्तांवर घालण्यात आलेल्या छाप्यांनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) राजकीय कारणांकरिता आपल्या कुटूंबीयांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) मुख्य नेते लालुप्रसाद यादव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घातलेल्या धाडीच्या दुसऱ्याच दिवशी सक्तवसुली संचलनालयाने त्यांची कन्या मिसा भारती यांच्या दिल्ली शहरामधील तीन फार्म हाऊसवर छापे घातले आहेत.

हे छापे आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणासंदर्भात होते. लालु यांच्या मालमत्तांवर घालण्यात आलेल्या छाप्यांनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) राजकीय कारणांकरिता आपल्या कुटूंबीयांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मिसा व त्यांचे पती शैलेश कुमार यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचा मनोदय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राजदच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​