मोदींच्या निर्णयाचा शेअर बाजारावर विपरित परिणाम

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक या दोन प्रमुख कारणांचा आज भारतातील शेअर बाजारावर विपरित परिणाम दिसून आला असून सोन्याचे भावही वधारले आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज 1600 अंशांची घसरण आढळून आली असून सोन्याचा भाव 34 हजार रुपयांवर पोचला आहे. तर रुपयाच्या किंमतीत 23 पैशांची घसरण झाली आहे.

सोन्याचा भावात तब्बल चार हजार रुपयांची वाढ झाली असून तो प्रति 10 ग्रॅम 34,000 रुपयांवर पोचला आहे. आगामी काळात सोन्याचे हे दर 38 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याशिवाय अमेरिकी अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचा भाव पाच आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. भारतीय रुपयाचे मूल्यदेखील 23 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 66.85 रुपये प्रति डॉलरएवढे झाले आहे.

शेअर बाजारात आज कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटो, बॅंकिंग, हेल्थकेअरसह इतर सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदविण्यात आली आहे. निफ्टीवर आयसीआयसीआय बॅंक, हिंडाल्को, भेल, बॅंक ऑफ बडोदा आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहे. परंतु कोणत्याही शेअरमध्ये वाढ नोंदविण्यात आलेली नाही.