पहिल्या तासात भाजप आघाडीवर

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीला आज (शनिवार) सकाळी सुरवात झाली. या निवडणुकींची मतमोजणी कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या विजयांचे दावे केल्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. देशाचे राजकीय भवितव्य, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि त्यांच्या सुधारणांच्या अजेंड्याविषयी लोकांचा कल प्रथमदर्शनी त्यांच्याबाजूने दिसू लागला आहे.

दिल्ली आणि बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडी राज्यात भाजपचा रथ रोखण्याविषयी आशावादी आहे. भाजपला या दोन्ही राज्यांत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. पंजाबच्या सत्तेची सूत्रे या वेळी आपल्याकडेच येणार, असा दावा करत असतानाच, काँग्रेस उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेची आशा व्यक्त करत आहे. आम आदमी पक्षासाठीही (आप) ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण समजली जात आहे. दिल्लीबाहेर विधानसभा निवडणुकीत प्रथमच रिंगणात उतरलेल्या आपने पंजाब आणि गोव्यात कडवी लढत देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. 

एकट्या उत्तर प्रदेशातील मतमोजणी केंद्रांवरच 20 हजार केंद्रीय दले तैतान करण्यात आली आहेत. अशा पद्धतीने देशभरातील मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय दलांचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील 75 जिल्ह्यांत 78 मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या राज्यात विधानसभेच्या 403 जागा आहेत. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसभेसाठी 15 मतमोजणी केंद्रे उभारली आहेत. 117 सदस्यांच्या पंजाबमध्ये 27 ठिकाणी 54 केंद्रे तर गोव्यातील 40 जागांवरील विजेते घोषित करण्यासाठी दोन केंद्रांवर मतमोजणी होईल. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी मतमोजणी होईल.

सकाळी नऊ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवरील पक्ष असेः 
उत्तर प्रदेशः 

 • भारतीय जनता पक्ष 85
 • काँग्रेस 6
 • समाजवादी पक्ष 13
 • बहुजन समाजवादी पक्ष 17 
 • इतर पक्षांनी 5 जागांवर आघाडी घेतली आहे.

उत्तराखंड :

 • भारतीय जनता पक्ष 10
 • काँग्रेस 8

मणिपूरः

 • भारतीय जनता पक्ष 1
 • काँग्रेस 1

गोवा :

 • भारतीय जनता पक्ष - 0
 • काँग्रेस - 2

पंजाबः

 • काँग्रेस 18
 • आम आदमी पक्ष 10
 • शिरोमणी अकाली दल 4
Web Title: UP election 2017 BJP Narendra Modi Akhilesh Yadav SP Congress Rahul Gandhi