पाच राज्यांत फेब्रुवारीत निवडणुकांची रणधुमाळी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूकांची रणधुमाळी उडणार असून, निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा आज (बुधवार) जाहिर केल्या. पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला (शनिवार) होणार आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूकांची रणधुमाळी उडणार असून, निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा आज (बुधवार) जाहिर केल्या. पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी 11 मार्चला (शनिवार) होणार आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये मतदान होणार आहे. गोवा, पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान होत असून 4 मार्चला पहिला टप्पा (38 जागा) तर 8 मार्चला दुसरा टप्पा असणार आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पाच राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून, सुमारे 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार असून, सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार आहेत. शिवाय, त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी माहिती पुस्तक देण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाचे नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार  आहे.
उत्तर प्रदेश सात टप्प्यांमध्ये मतदान

 1. पहिला टप्प्याचं मतदान 11 फेब्रुवारीला
 2. दुसरा टप्प्याचं मतदान 15 फेब्रुवारीला
 3. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 फेब्रुवारीला मतदान
 4. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारीला मतदान
 5. पाचव्या टप्प्याचं मतदान 27 फेब्रुवारीला
 6. सहाव्या टप्प्याचं मतदान 4 मार्चला
 7. सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 08 मार्चला मतदान

निवडणूकांच्या तारखा-

 • गोवा, पंजाब - 4 फेब्रुवारी
 • उत्तराखंड - 15 फेब्रुवारी
 • मणिपूर - 4 व 8 मार्च मतदान (दोन टप्प्यात)
 • उत्तर प्रदेश- सात टप्प्यांमध्ये मतदान

गोवा निवडणूक : अर्ज भरण्याचा दिवस 11 जानेवारी, अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस 18 जानेवारी, पडताळणी 19 जानेवारी, 4 फेब्रुवारीला मतदान

उमेदवार जागा-

 • उत्तर प्रदेश- 403 जागा
 • पंजाब- 117 जागा
 • उत्तराखंड - 70
 • मणिपूर- 60
 • गोवा- 40

(एकूण 619 जागांपैकी 133 जागांवर अनुसुचित)

प्रमुख मुद्दे-

 • पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार आहे.
 • महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार
 • सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार
 • स्लिपवर मतदारांचे छायाचित्र असणार
 • पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू
 • व्होटिंग मशिनवर उमेदवाराचा फोटो असणार
 • प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करता येणार नाही
 • प्रचारासाठी रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरला बंदी, पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देखरेखीचे आदेश
 • उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड- उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा - 28 लाख, तर गोवा आणि मणिपूर 20 लाख खर्च करता येणार
 • उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक
 • काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार
 • निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी
 • प्रचारासाठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या जाहिराती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरल्या जातील